मुळव्याधीचे प्रकार

मूळव्याधीचा (Piles / Mulvyadh / Bavasir) दिवसेंदिवस त्रास सहन केला जातो. वेळीच उपचार केले तर मूळव्याध पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितकारक आहे.
सर्व प्राणीजगतामध्ये मनुष्य हा असा एकमेव प्राणी आहे ज्याला मूळव्याध हा आजार होतो. त्याला कारण आहे तो दोन पायांवर उभा राहतो म्हणून. शौचावर नियंत्रण राहण्यासाठी गुदद्वाराच्या आतील भागात नळीच्या आकाराचा भाग असतो. एखाद्या कारणाने हा भाग मोठा होतो किंवा कधी बाहेर येऊन रक्तसाव सुरू होतो. शिजवलेले अन्न खाणे, तंतूमय पदार्थांचा जेवणातील अभाव, कमी शारीरिक हालचाली आणि कामानिमित्ताने सतत बसून राहणे या बदलत्या जीवनशैलीतील कारणांमुळे मूळव्याधीचे प्रमाण सतत वाढत आहे. शौच करताना वेदना होणे, रक्तसाव होणे, गुदद्वाराचा बाह्य भाग फुगीर होणे किंवा गाठी निर्माण होणे ही मूळव्याधीची सर्वसामान्य लक्षणे आहेत. मुळव्याध ही गुदद्वाराच्या आतील भागातही उद्भवू शकते. त्यावेळी फारशा वेदना होत नाहीत, मात्र शौचावाटे रक्त जाते.
फिशर्स अर्थात गुदद्वाराच्या जागी जखम होणे हेसुद्धा मूळव्याधीशीच संबंधीत आजार आहेत. मूळव्याध (Piles / Mulvyadh) हा काही गंभीर आजार नसला तरी त्यामुळे रूग्ण सतत अस्वस्थ राहतो. मलावरोध तसेच शौचाला जोर काढायला लागणे आदींमुळे मूळव्याधीचा त्रास बळावू शकतो. ही झाली सर्वसामान्य मूळव्याध.
याशिवाय यकृताचे आजार किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग यांसारख्या एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण म्हणूनसुद्धा मूळव्याध असू शकतो. मूळव्याधीच्या तीन अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेत गुदद्वाराच्या आतल्या भागात फुगवटे निर्माण होतात. दुसऱ्या अवस्थेत हे फुगवटे मोठे होतात व शौचाच्यावेळी जोर लावल्यास ते बाहेर येऊ शकतात. तिसऱ्या अवस्थेत हे फुगवटे बाहेर येतात आणि ते आत ढकलणे कठीण होऊन जाते. मूळव्याधीचा (Piles / Mulvyadh) आजार हा असा चढत्या श्रेणीने अधिकाधिक बळावणारा असल्यामुळेच त्याच्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.
निसर्गोपचार पध्दती
योगोपचार पध्दती
अधिक माहीतीसाठी......